Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

राजभाषा संचालनालयातर्फे तांत्रिक शब्दावली निर्मिती कार्यशाळेचे यशस्वी आयोजन

२४ जुलै, २०२६

गोवा सरकारच्या राजभाषा संचालनालयाने, भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक शब्दावली आयोग (सी. एस. टी. टी.) नवी दिल्ली यांच्या सहकार्याने,कोकणी भाषेतील वैज्ञानिक आणि तांत्रिक शब्दावली समृद्ध आणि प्रमाणित करण्याच्या चालू प्रयत्नांचा एक भाग म्हणून १३ ते १८ जुलै २०२६ या कालावधीत पणजी येथील राजभाषा संचालनालयात भूगोल, जनसंचार/पत्रकारिता आणि नाट्यशास्त्र या क्षेत्रात तीन तांत्रिक शब्दावली निर्मिती कार्यशाळेचे यशस्वीरित्या आयोजन केले होते.

या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी राजभाषा संचालनालयाचे संचालक श्री विवेक नाईक उपस्थित होते. शब्दावली तयार करण्यासारख्या महत्वाच्या कामांमुळे भाषा समृध्द होते आणि दैनंदिन व्यवहारात, शैक्षणिक व इतर क्षेत्रांमध्ये भाषेचा वापर अधिक सुलभ होतो असे ते यावेळी म्हणाले. याप्रसंगी सी. एस. टी. टी. नवी दिल्ली यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

भूगोल तांत्रिक शब्दावली निर्मिती कार्यशाळा १३ ते १७ जुलै २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती आणि या कार्यशाळेला भूगोलचे पाच सहाय्यक प्राध्यापक आणि दोन कोकणी भाषातज्ञ सहभागी झाले होते. कार्यशाळेदरम्यान, सहभागींनी विषय- विशिष्ट मूलभूत तांत्रिक शब्दावलीवर व्यापक चर्चा केली आणि विविध भौगोलिक संकल्पनांसाठी योग्य कोंकणी तांत्रिक संज्ञा तयार करून शब्द निर्माण आणि प्रमाणित करून शब्दावलीचा मसुदा तयार केला.

जनसंपर्क तांत्रिक शब्दावली निर्मिती कार्यशाळा आणि नाट्यशास्त्र मूलभूत शब्दावली कार्यशाळा १४ ते १८ जुलै २०२६ दरम्यान एकाच वेळी आयोजित करण्यात आल्या होत्या. या कार्यशाळांमध्ये सहभागी झालेल्या आणि आपापल्या क्षेत्रात वापरल्या जाणार्‍या तांत्रिक परिभाषांसाठी योग्य कोंकणी समतुल्य ओळखण्यासाठी, चर्चा करण्यासाठी आणि शब्द निर्माण करण्यासाठी काम करणार्‍या कोकणी भाषातज्ञ आणि भाषाशास्त्रज्ञांसह नाटक, रंगभूमी, तियात्र, चित्रपटांमधील प्रसिद्ध व्यक्तींना विषयतज्ञ म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. नाट्यशास्त्राचा पहिला टप्पा पूर्ण झाला, तर जनसंपर्कावरील पुनरावलोकन कार्यशाळा आयोजित करण्यात आली, ज्यात तज्ञांमधील सविस्तर चर्चा आणि एकमतानंतर तज्ञांनी बैठकीत आधीच तयार केलेल्या शब्दांना अंतिम स्वरूप देण्यात आले.

या कार्यशाळांदरम्यान तयार केलेल्या शब्दावलीचा मसुदा प्रकाशनासाठी विचारात घेण्यापूर्वी पुढील आढावा आणि परिष्करणास अधीन असेल. हे उपक्रम कोंकणी भाषेचा वैज्ञानिक आणि तांत्रिक शब्दसंग्रह बळकट करण्याच्या आणि विस्तारण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे ज्यामुळे शैक्षणिक, तांत्रिक आणि प्रशासकीय क्षेत्रात भाषेच्या प्रभावी वापराला प्रोत्साहन मिळेल.

इतर विविध विषयांमधील शब्दावलीची तयारीही संचालनालयाकडून हाती घेतली जाईल आणि त्यासाठीची प्रक्रिया आधीच सुरू आहे.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/४५३

Skip to content