पेटंट आणि ट्रेडमार्क एजंट परीक्षा २०२७ साठी पूर्वतयारीचे प्रशिक्षण वर्ग
२९ जून, २०२६
गोवा राज्य विज्ञान व तंत्रज्ञान परिषदेच्या साळगाव येथील आयपी फॅसिलिटेशन सेंटरने, गोविंद रामनाथ कारे कायदा महाविद्यालय, मडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पेटंट आणि ट्रेडमार्क एजंट परीक्षा २०२७ साठी पूर्वतयारी प्रशिक्षण वर्गांचे आयोजन केले आहे.
ही परीक्षा भारत सरकार, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, नवी दिल्ली येथील उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन खात्याद्वारे आयोजित केली जाते. या परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन खात्याद्वारे जाहीर करण्यात आली असून ती १४ ऑगस्ट, २०२६ पर्यंत सुरू राहील. पेटंट एजंट परीक्षेसाठी विज्ञान किंवा तंत्रज्ञान / अभियांत्रिकी शाखेतील कोणताही पदवीधर अर्ज करण्यास पात्र आहे, तर ट्रेडमार्क एजंट परीक्षेसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणताही पदवीधर विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहे. या परीक्षा जानेवारी २०२७ महिन्यात आयोजित केल्या जातील.
पेटंट / ट्रेडमार्क क्षेत्रात व्यावसायिक तज्ञ म्हणून आपले करिअर घडविण्यासाठी इच्छुक आणि पात्र गोव्याच्या विद्यार्थ्यांना या अनोख्या संधीचा लाभ घेण्याची विनंती आहे. वर्ग ऑफलाइन आणि ऑनलाइन पद्धतीने होतील आणि आठवड्यातून जास्तीत जास्त १-२ वर्ग असतील. जागा मर्यादित असून, प्रवेश ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर दिला जाईल.
अधिक माहितीसाठी दीपक परब मो. क्र. ९८३४५५३९३१ किंवा कारे कायदा महाविध्यालयाचे प्रा. मर्व्हिल रॉड्रिग्स मो. क्र. ९८२२१८४६४७ यांच्याशी संपर्क साधावा.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/४०४
