Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

पावसाळ्यात नैसर्गिक जलाशयांमध्ये पोहण्यावर बंदीचे आदेश

२९ जून, २०२६

दक्षिण गोवा आणि कुशावती जिल्हाधिकाऱ्यांनी पावसाळ्यात दक्षिण गोवा आणि कुशावती जिल्ह्याच्या भागात धबधबे, पडीक खाणी, नद्या, तलाव आणि इतर तत्सम नैसर्गिक जलस्रोतांमध्ये पोहण्यास, अंघोळ करण्यास किंवा प्रवेश करण्यास बंदी लागू केली आहे.

धबधब्यांमध्ये भेट देण्यास मनाई नाही. तथापि, धबधब्यांमध्ये पोहणे, अंघोळ करणे, पाण्यात उतरणे, डुबकी मारणे, कड्यावरून उडी मारणे किंवा पाण्याशी संबंधित इतर कोणत्याही कृतीत सहभागी होण्यास बंदी आहे. धबधबे, निसर्गरम्य स्थळे, ट्रेकिंग मार्ग किंवा इतर पर्यावरण-पर्यटन स्थळांना भेट देणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने संबंधित सरकारी यंत्रणानी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. हा आदेश अगोदर मागे न घेतल्यास पुढील ६० दिवसांसाठी लागू राहील.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/४०५

Skip to content