अटल आसरा योजनेसाठी अर्ज
१५ जून २०२६
आदिवासी कल्याण संचालनालयाने, राज्यभरातील अनुसूचित जमाती कुटुंबांचे राहणीमान सुधारण्याच्या उद्देशाने असलेल्या अटल आसरा योजनेसाठी अर्ज मागविले आहेत.
या योजनेअंतर्गत, पात्र लाभार्थ्यांना नवीन घर बांधण्यासाठी आणि विद्यमान घराच्या पुनर्बांधणीसाठी ५ लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत देण्यात येते. विद्यमान घरांच्या दुरुस्तीसाठी ३ लाख रुपयांपर्यंतची मदत देण्यात येते. वार्षिक उत्पन्नाची पात्रता मर्यादा ३ लाख रुपयांवरून ५ लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे, ज्यामुळे अधिक संख्येने अनुसूचित जमाती कुटुंबांना या योजनेचा लाभ घेणे शक्य होईल.
अर्जदारांनी प्रतिज्ञापत्र, घर कराची पावती, उत्पन्नाचा दाखला, अनुसूचित जमातीचा दाखला, आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुकची प्रत, सध्याच्या घराचे छायाचित्र आणि इतर विहित कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/३८१
