Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

उध्या १६ जून रोजी सिध्दार्थ बांदोडकर उच्च माध्यमिक विध्यालयास खासदार योजनेखाली स्कुल बस

१५ जून २०२६

वेळगे येथील सिध्दार्थ बांदोडकर उच्च माध्यमिक विध्यालयास स्थानिक क्षेत्र विकास योजनेखाली उध्या १६ जून रोजी स्कुल बस प्रदान करण्यात येईल. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्याहस्ते राज्य सभेचे खासदार श्री सदानंद तानावडे, उत्तर गोवा जिल्हाधिकारी श्री अंकित यादव आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येईल. ही बस भारत सरकारच्या खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजनेअंतर्गत खरेदी करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांसाठी वाहतुकीच्या सुविधांमध्ये सुधारणा होईल आणि जवळपास राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्याचा लाभ होईल. गोव्यातील एका दुर्गम भागात शैक्षणिक सुविधा आणि विद्यार्थ्यांची गतिशीलता मजबूत करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

नव्याने खरेदी केलेल्या बसमध्ये अंदाजे ४५ प्रवाशांची आसनक्षमता असून, त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवासातील अडचणी कमी होण्यास आणि नियमित उपस्थिती राखण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/३८०

Skip to content