Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

रील मेकींग स्पर्धेचा निकाल जाहीर

४ जून, २०२६

कला आणि संस्कृती संचालनालयाने वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचे १५० वे वर्ष साजरे करण्याच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून २३ ते ३० मार्च २०२६ या कालावधीत आयोजित केलेल्या रील निर्मिती स्पर्धेचा निकाल जाहीर केला आहे.

१८ वर्षांवरील वयोगटात श्रीमती हस्ती गज्जर यांना १०,००० रूपयांचे प्रथम बक्षिस, श्री. विठोबा गुरव यांना ७,००० रूपयांचे दुसरे आणि श्री. उमेश खोलकर यांना ५,००० रूपयांचे तृतीय बक्षिस प्राप्त झाले.

१८ वर्षांखालील गटात कुमारी युती सावर्डेकर यांना १०,००० रूपयांचे प्रथम बक्षिस, कुमारी साईश्री यांना ७,००० रूपयांचे दुसरे आणि अथर्व नार्वेकर यांना ५,००० रूपयांचे तृतीय बक्षिस प्राप्त झाले.

कला आणि संस्कृती संचालनालयाने सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले असून, प्रत्येक सहभागीच्या प्रयत्नांची प्रशंसा केली आहे, ज्यांच्या योगदानामुळे ही स्पर्धा भारताच्या समृद्ध वारशाचा आणि देशभक्तीच्या भावनेचा एक अर्थपूर्ण सोहळा बनली. या स्पर्धेने, ‘वंदे मातरम’च्या संदेशात अंतर्भूत असलेल्या राष्ट्रीय एकता, त्याग आणि अभिमानाच्या आदर्शांशी नागरिकांना, विशेषतः तरुणांना, जोडण्यासाठी डिजिटल कथाकथनाची शक्ती यशस्वीपणे प्रतिपादली.

विजेत्यांना योग्य वेळी प्रमाणपत्रे आणि बक्षिसे प्रदान केली जातील.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/६५

Skip to content