चौथी अखिल गोवा आंतरशालेय तियात्र स्पर्धा २०२६ प्रवेशिका सादर करण्यास मुदत वाढ
‘शाळेसाठी तियात्र प्रोत्साहन’ या योजनेअंतर्गत गोवा तियात्र अकादमीने चौथ्या अखिल गोवा आंतरशालेय तियात्र स्पर्धा २०२६ साठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ११ जून २०२६ वरून २६ जून २०२६ पर्यंत वाढविली आहे. सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शाळांनी पूर्ण भरलेले अर्ज गोवा तियात्र अकादमी ब्लॉक ए, दुसरा मजला, कांपाल ट्रेड सेंटर, कापाल, पणजी, गोवा, येथे कार्यालयीन वेळेत २६ जून २०२६ पूर्वी सादर करावेत. स्पर्धेच्या इतर सर्व अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल होणार नाही.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/३६४
