Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

१९ मे २०२६

११ केव्ही सिरसई फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २० मे २०२६ रोजी सकाळी ८.३० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत कांसा टेल, कांसा, रेल्वे स्टेशन, खारगाळे, आईस फॅक्टरी आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

त्याचप्रमाणे ११ केव्ही मयडे फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २१ मे २०२६ रोजी सकाळी ८.३० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत मयडे आणि नास्नोडा ग्रामपंचायत भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

तसेच ११ केव्ही कुंभारजुवा फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २१ मे २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत संपूर्ण सांतइस्तेव गावात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/३०

Skip to content