Konkani Press ReleaseLatest NewsPress Releases

निवडणूक काळात दारूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश

४ मे २०२६

९ ते ११ मे २०२६ रोजी पर्यंत पिसुर्ले, डोंगुर्ली ठाणा, भाटी आणि वेर्णा ग्राम पंचायतीतील वार्डात पोटनिवडणूक होणार असून या निवडणूकीवेळी तसेच मतमोजणीच्या दिवशी सरकारने सर्व परवानाधारक दारूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

बार आणि रेस्टोरंटचा परवाना असलेली दुकाने फक्त जेवण देण्यासाठी खुली ठेवण्यास मान्यता आहे. तथापि बार काऊंटर मात्र वरील दिवशी बंद ठेवावे आणि दारूची विक्री करू नये. बार आणि रेस्टोरंटचा परवाना असलेल्या मालकांनी फक्त जेवण मिळेल असा फलक बाहेर लावावा.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/२९०

Skip to content