Konkani Press ReleaseLatest NewsPress Releases

वीज पुरवठा खंडित

४ मे २०२६

११ केव्ही आरोसी फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ६ मे २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत बागा, कांसावली चर्च, झेंडो आणि मुर्डी भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

त्याचप्रमाणे ११ केव्ही बाराझन सांगे फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ६ मे २०२६ रोजी सकाळी ८.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत बामणमळ आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

तसेच ११ केव्ही कुठ्ठाळी फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ६ मे २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत मीटिंग पॉईंट, हॉटेल म्हार्दोळ, वेर्णा मशीद, केसरवाळ हॉटेल, एचटीसी टोयोटा, सोडा फॅक्टरी, किरा पावला आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/२८६

Skip to content