Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

माहिती तंत्रज्ञान खात्याकडून एआय धोरणाचा मसुदा प्रसिद्ध

१ मे २०२६

माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि संचार खात्याने राज्यात एक सर्वसमावेशक आणि नवोन्मेष-चालित एआय परिसंस्था विकसित करण्याच्या उद्देशाने गोवा राज्यासाठी ‘गोवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स धोरण २०२६ चा मसुदा’ प्रसिद्ध केला आहे.

गोवा एआय धोरण २०२६ च्या मसुद्यामध्ये, कौशल्य आणि क्षमता बांधणी, स्टार्टअप्स आणि उद्योग सक्षमीकरण, भांडवल आणि गुंतवणूक प्रोत्साहन, धोरण, प्रशासन आणि डिजिटल पायाभूत सुविधा यांसारख्या प्रमुख स्तंभांवर लक्ष केंद्रित करून गोव्याला कृत्रिम बुद्धिमत्तेचे एक प्रमुख केंद्र म्हणून स्थापित करण्याची राज्याची दूरदृष्टी मांडण्यात आली आहे.

धोरणाचा मसुदा दस्तऐवज या सूचनेच्या प्रकाशनापासून १५ (पंधरा) दिवसांच्या कालावधीसाठी सल्लामसलतीकरिता ४ मे, २०२६ पासून गोवा राज्य पोर्टल https://www.goa.gov.in/ गोवा ऑनलाइन https://goaonline.gov.in/ आणि माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि संचार खात्याच्या अधिकृत वेबसाइट www.dit.goa.gov.in वर उपलब्ध करून दिला जाईल. सूचना dir-it.goa@nic.in या ईमेलद्वारे सादर कराव्या.

नागरिक, उद्योग प्रतिनिधी, स्टार्टअप्स, शैक्षणिक संस्था आणि नागरी समाज यांसह सर्व संबंधितांना गोवा एआय धोरण २०२६ च्या मसुद्यावर त्यांच्या सूचना सादर करण्यासाठी आमंत्रित करण्यात येत आहे.

.’विकसित भारत २०४७’ च्या संकल्पनेशी आणि गोव्याला एक सृजनशील व एआय-चालित डिजिटल अर्थव्यवस्था बनविण्याच्या उद्दिष्टाशी सुसंगत असे दूरदर्शी आणि सर्वसमावेशक एआय धोरण तयार करण्यासाठी, सदर खात्याने सर्व हितधारकांकडून मौल्यवान सूचना मागविल्या आहे.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/२८४

Skip to content