Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

गोवा व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्य प्रदर्शन आणिपरिषदेचे आयोजन

२७ एप्रिल २०२६

कारखाने आणि बॉयलर निरीक्षक कार्यालयाच्यावतीने २९ आणि ३० एप्रिल २०२६ रोजी बांबोळी येथील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये दुसऱ्या गोवा व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्य प्रदर्शन आणि परिषद २०२६’ चे आयोजन करणार आहे. ही दोन दिवसीय परिषद सकाळी १०:०० ते सायंकाळी ६:०० या वेळेत आयोजित केली जाईल.

व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्य क्षेत्रातील ज्ञान आणि उपाय योजनांवर प्रमुख भाषणे, आधुनिक सुरक्षा तंत्रज्ञान, उपकरणे आणि उपायांचे प्रदर्शन आणि नवीन सुरक्षा उपाय धोरणे आणि सुधारणा करण्याच्या प्रस्तावांचे समर्थन करणे, व्यावसायिकांमध्ये सार्वजनिक सुरक्षा आणि जागरूकता वाढविणे, सुरक्षा उपायाविषयीची आव्हाने जाणून घेणे आमि त्यावर उपाय करणे हे या दोन दिवसीय कार्यक्रमाचे उद्दीष्ट आहे.

मा/वाप/अहे/एपी/र ना/२०२६/२५९

Skip to content