Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

डिजिटल भारतासाठी सायबर सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्याकरिता CERT-IN संवाद २०२६ चे आयोजन

२७ एप्रिल २०२६

CERT-In एमपॅनेलवरील ऑडिटिंग संस्थांची तीन दिवसीय वार्षिक परिषद, ‘संवाद २०२६’, आज बिट्स पिलानी केके बिर्ला गोवा कॅम्पस येथे सुरू झाली असून ती २९ एप्रिलपर्यंत चालेल. या परिषदेत भारत आणि परदेशातून ५०० हून अधिक प्रतिनिधी एकत्र आले आहेत. “भविष्यासाठी सज्ज ऑडिटद्वारे डिजिटल भारताला सुरक्षित करणे: अनुकूलन, आश्वासन, प्रगती” या संकल्पनेवर आधारित या परिषदेचा उद्देश, सहकार्य, नावीन्य आणि दूरदर्शी ऑडिट कार्यपध्दतीच्या माध्यमातून भारताची सायबर सुरक्षा यंत्रणा मजबूत करणे हा आहे.

या कार्यक्रमात सायबरसुरक्षा क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या घडामोडी अधोरेखित झाल्या, ज्यात ब्लॉकचेन-सक्षम सायबर सुरक्षा ऑडिट प्लॅटफॉर्म असलेल्या ‘अंबॅक’ (AMBAK) चा शुभारंभ, ऑडिट फ्रेमवर्कवरील कार्यगटाचा प्रगती अहवालही सादर करण्यात आला. याव्यतिरिक्त, CERT-In ने नाबार्ड आणि बर्ड (BIRD) यांच्या सहकार्याने सुरू केलेला एक प्रगत सायबरसुरक्षा प्रमाणपत्र अभ्यासक्रम, कौशल्य विकास आणि संस्थात्मक क्षमतावाढीच्या उपक्रमाचा शुभारंभ झाला.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा जरी पूर्वीपासून ‘सूर्य, वाळू आणि समुद्र’ यासाठी ओळखला जात असला तरी, आता तो सायबर सुरक्षेचे केंद्र म्हणूनही उदयास येत आहे असे सांगितले. देशभरातून आणि जगभरातून प्रतिनिधी केवळ गोव्याच्या निसर्गरम्य आकर्षणासाठीच नव्हे, तर डिजिटल भविष्य सुरक्षित करण्यावर अर्थपूर्ण चर्चा करण्यासाठी येथे जमले आहेत. प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या ‘डिजिटल इंडिया’च्या संकल्पनेनुसार सुरक्षित डिजिटल प्रणालींच्या महत्त्वावर भर देताना, त्यांनी अशा कार्यक्रमांसोबतच राज्याच्या आध्यात्मिक समृद्धीचा अनुभव घेण्यासही सांगितले.

सायबर सुरक्षेसाठी राष्ट्रीय सल्लागार संस्था म्हणून CERT-In एक महत्त्वाची भूमिका बजावते. आणि परिषदेदरम्यान चर्चा झालेले ‘ऑडिट मॉनिटरिंग बेंचमार्क ॲनालिसिस’ सारखे उपक्रम, यंत्रणा मजबूत करण्यासाठी आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या तंत्रज्ञानामुळे सायबर सुरक्षेला चालना मिळू शकते असेही त्यांनी सांगितले.

या प्रसंगी CERT-In चे वरिष्ठ संचालक श्री एस. एस. शर्मा; CERT-In चे महासंचालक डॉ. संजय बहल, BITS पिलानी गोवा कॅम्पसचे संचालक प्रा. सुमन गुंडू; डॉ. नितुपम मल्होत्रा; श्री शशी धरन; श्री एस. कृष्णन यांच्यासह सायबर सुरक्षा क्षेत्रातील इतर मान्यवर उपस्थित होते.

मा/वाप/अहे/एपी/र ना/२०२६/२६०

Skip to content