पंढरपूर वारीसाठी वारकरी गटांची नोंदणी
२१ एप्रिल २०२६
कला आणि संस्कृती संचालनालयाने वार्षिक पंढरपूर वारीमध्ये सहभागी होणाऱ्या गोव्याच्या वारकऱ्यांना मदत योजना या योजनेखाली गोव्यातील वारकरी (दिंडीं) गटांच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू केली आहे. गोव्याच्या वारकरी संप्रदायास पंढरपूर वारीमध्ये सहभागी होण्यास आणि भक्तीपूर्ण परंपरेला सहकार्य देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
गोव्याच्या सर्व दिंडी पथकांच्या प्रमुखांनी विहीत नमुन्यातील अर्ज भरून आवश्यत दाखल्यासह विहित मुदतीत सादर करावे. दिंडी प्रमुखांनी सहभागींच्या तपशिलांची सादर करण्यापूर्वी योग्य छाननी आणि पडताळणी करावी, जेणेकरून नोंदणी प्रक्रिया व्यवस्थित होईल.
नोंदणी अर्ज कला आणि संस्कृती संचालनालयाच्या अधिकृत वेबसाइट www.artandculture.goa.gov.in वर उपलब्ध आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १० मे २०२६ अशी आहे.
मा/वाप/अहे/एपी/र ना/२०२६/२५४
