Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

१८ एप्रिल रोजी महिला साहित्यिक मेळाव्याचे आयोजन

१५ एप्रिल २०२

मिनेझिस ब्रागांझा संस्थेने १८ एप्रिल २०२६ रोजी प्रीयाल फार्म हाऊस, कॅम्पा, खांडेपार, फोंडा येथे “बहुभाषिक महिला साहित्यिक मेळावा” आयोजित केला आहे.

महिला साहित्य मेळाव्याचा उद्घाटन सोहळा १८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता होणार आहे. याचे उद्घाटन समाजसेविका श्रीमती सुलक्षणा सावंत यांच्या हस्ते इतर मान्यवरांच्या उपस्थितीत होईल. या मेळाव्यात साहित्य क्षेत्रात योगदान दिलेल्या प्रख्यात महिला व्यक्तिमत्त्वे सहभागी होणार आहेत. या सत्रांमध्ये प्रख्यात कवयित्री, लेखिका, पॅनल चर्चा, नवोदित लेखकांना मार्गदर्शन इत्यादींचा समावेश असेल.

समारोप सोहळा त्याच दिवशी म्हणजेच १८ एप्रिल, २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता होणार आहे. मिनेझीिस ब्रागांझा संस्थेने गोव्यातील महिला लेखिका आणि कवियत्रींना बहुभाषिक महिला साहित्य मेळाव्यात उपस्थित राहण्याची विनंती केली आहे.

मा /वाप/ दिबा/ एपी/ र ना/२०२६/ २४८

Skip to content