राष्ट्रीय साहसी पुरस्कारांसाठी अर्ज
३१ जुलै २०२६
क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालयाने भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने ‘वर्ष २०२५ साठी तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कारासाठी नामांकने, अर्ज मागविले आहेत. हा पुरस्कार साहसी क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींच्या कामगिरीच्या सन्मानार्थ दिला जातो. जमिनीवरील, पाण्यातील (समुद्रातील) आणि हवाई साहसी उपक्रमांसाठी प्रत्येकी एक पुरस्कार दिला जातो. याव्यतिरिक्त, साहसी क्षेत्रातील ‘जीवनगौरव कामगिरी’साठी एक पुरस्कार देण्याचीही तरतूद करण्यात आली आहे.
पुरस्काराचे नियम व विहित नमुन्यातील अर्जा क्रीडा व्यवहार संचालनालयाच्या www.dsya.goa.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
इच्छुक उमेदवार क्रीडा व युवा व्यवहार संचालनालय, कांपाल पणजी यांच्याकडून शिफारस मिळाल्यानंतर २० ऑगस्ट २०२६ पर्यंत पोर्टल ( https://awards.gov.in ) द्वारे आपला अर्ज अपलोड करू शकतात.
अधिक माहितीसाठी इच्छुकांनी एपीईओ श्री पांडुरंग नाईक यांच्याशी मोबाईल क्रमांक ८८३०६८१५८८ वर संपर्क साधावा.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/४७२
