राज्यपालांकडून गोव्यातील लोकांना दसऱ्याच्या शुभेच्छा
१९ ऑक्टोबर, २०२६
राज्यपाल पुसापती श्री अशोक गजपती राजू यांनी गोव्यातील सर्व जनतेला दसऱ्याच्या शुभप्रसंगी हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात, “दसरा हा सण वाईट प्रवृत्तीवर सद्गुणाचा, सत्याचा कपट प्रवृत्तीवर आणि अन्यायावर न्यायाचा विजयाचे प्रतिक आहे. दसरा हा सण आपल्याला आपल्या समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या कालातीत मूल्यांची आठवण करून देतो आणि सत्य, सद्गुण, धैर्य व करुणा यांच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो. हा सण चांगुलपणाच्या चिरस्थायी शक्तीवरील आपला विश्वास आणि आपल्या वैयक्तिक व सार्वजनिक जीवनात नैतिक मूल्यांचे पालन करण्याचे महत्त्वही दृढ करतो.”
राज्यपाल पुढे म्हणतात, “दसऱ्याच्या उत्सवात समाजासाठी एक गहन संदेश दडलेला आहे. तो आपल्याला नकारात्मक विचार, पक्षपात आणि मतभेद यांवर मात करून शांतता, सलोखा, परस्पर आदर आणि सामंजस्य वाढविण्यास प्रोत्साहित करतो. या सणाशी निगडित आदर्श आपल्याला योग्य गोष्टींसाठी ठामपणे उभे राहण्यास, आपली कर्तव्ये प्रामाणिकपणाने आणि सचोटीने पार पाडण्यास आणि समाजाच्या कल्याणासाठी सकारात्मक योगदान देण्यास प्रेरित करतात.”
“हा सण साजरा करीत असताना, आपण त्यांच्या कालातीत संदेशातून प्रेरणा घेऊया आणि आपल्या राज्याच्या व राष्ट्राच्या विकासासाठी व समृद्धीसाठी एकत्रितपणे कार्य करूया. सर्वाना न्याय, परस्पर आदर आणि सर्वांसाठी समान संधी देणे समाजाची सत्याच्या पायावर उभारणी करण्याच्या आपल्या प्रयत्नांमध्ये दसऱ्याच्या पवित्र भावनेतून आपल्याला मार्गदर्शन करो.”
“या आनंदमय प्रसंगी, आपण सर्वांच्या शांतता, सुख, उत्तम आरोग्य आणि समृद्धीसाठी प्रार्थना करूया. दसऱ्याचा हा शुभ सण आपल्याला सत्याच्या मार्गावर चालण्याची, सत्य आणि करुणेची मूल्ये जपण्याची आणि उज्ज्वल, अधिक शांततापूर्ण व सलोख्याच्या भविष्यासाठी एकत्र काम करण्याची प्रेरणा देवो”, असे राज्यपाल आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.
मा/वाप/अभी/ एपी/र ना/२०२६/७०१
