राज्यपालांकडून गोव्यातील लोकांना बैसाखीच्या शुभेच्छा
१३ एप्रिल २०२६
गोव्याचे राज्यपाल श्री. पुसापती अशोक गजपती राजू यांनी गोव्यातील लोकांना विशेषत: शीख बांधवांना तसेच देशात आणि विदेशात हा उत्सव साजरा करणाऱ्या सर्वांना बैसाखीच्या हार्दिक शुभेच्या व्यक्त केल्या आहेत.
आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात, बैसाखी सणाने कापणीच्या हंगामाची सुरुवात होत असून हा सण शीख समुदायासाठी आनंद, कृतज्ञता आणि नवीन सुरुवातीचा सण आहे. या सणाला मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे, हा उत्सव खालसा स्थापनेची आठवण करून देतो, जो शौर्य, एकता आणि निःस्वार्थ सेवेच्या भावनेचे प्रतीक आहे.
हा शुभप्रसंग आपल्याला कठोर परिश्रम, चिकाटी आणि आपल्याकडील चांगल्या गोष्टी इतरांसोबत वाटून घेण्याचे महत्त्व पटवून देतो. या सणाचा सलोखा आणि एकतेचा संदेश आम्हाला बंधुत्वाचे आणि परस्पर आदराचे बंध अधिक दृढ करण्यासाठी सतत प्रेरणा देतो.
हा सण आपण सर्वांना सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो आणि शांतता, प्रगती व सर्वसमावेशक विकासाप्रती असलेली आपली सामूहिक वचनबद्धता अधिक दृढ करो,’ असे राज्यपाल आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.
मा/वाप/दिबा/एपी/र ना/२०२६/२३६
