Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

नाविकांना सूचना

२५ मे २०२६

भारत सरकारच्या केंद्रीय जल आयोगाने केलेल्या नदीतील पाण्याच्या प्रवाहाच्या अभ्यासाच्या पार्श्वभूमीवर २९ मे २०२६ रोजी तेरेखोल-केरी (आरोंदा पुलापासून सुमारे १०० मीटर खाली), ३० मे २०२६ रोजी मडगाव मार्गावरील जुवारी-बोरी (बोरी पुलापासून सुमारे २०० मीटर खाली), ३० मे २०२६ रोजी चोपडे-कोलवाळे (कोलवाळे-दरगल पुलापासून सुमारे २०० मीटर वर) आणि २८ मे २०२६ रोजी मांडवी-पणजी व मत्स्योध्योग जेट्टी येथे कार्यरत असलेल्या सर्व बार्ज/बोटींना नदीत अभ्यास चालू असताना कोणताही अडथळा येणार नाही म्हणून वरील काळांत लक्ष ठेऊन सावकाश वाहतूक करावी आणि गरज पडल्यास सुरक्षित अंतरावर थांबावे. तसेच देण्यात येणाऱ्या सुचनांचे पालन करावे असे बंदर कप्तान खात्याने कळविले आहे.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/३४१

Skip to content