Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण राष्ट्रीय पुरस्कारासाठी अर्ज

१८ जून २०२६

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने २०२६ वर्षासाठीच्या दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण राष्ट्रीय पुरस्कारासाठी अर्ज मागविले आहेत. या पुरस्काराठी ऑनलाईन नामांकने, अर्ज स्वीकारण्यासाठी www.awards.gov.in हा राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल सुरू केला आहे.

दिव्यांगजनांच्या सशक्तीकरणासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी ३ डिसेंबर रोजी दिव्यांग व्यक्ती आंतरराष्ट्रीय दिनी हे राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येतील.

दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण राष्ट्रीय पुरस्कारासाठीची सोपी आणि तर्कशुध्द मार्गदर्शक तत्वे खात्याच्या (www.depwd.gov.in ) या वेबसाईटवर तसेच ( www.awards.gov.in ) या पुरस्कार पोर्लवर उपलब्ध आहेत.

अर्ज, नामांकने सादर करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२६ अशी आहे. अधिक माहितीसाठी पात्र व्यक्ती, निम सरकारी संस्था, संस्था आणि संबंधितानी दिव्यांग व्यक्ती सशक्तिकरण संचालनालय, पर्वरी गोवा येथे संपर्क साधावा.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/३८५

Skip to content