गोवा विधीमंडळ सचिवालयाकडून क्षमता बांधणी कार्यक्रमाचे आयोजन
१० जुलै, २०२६
गोवा विधिमंडळ सचिवालयाने विधीमंडळ प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता आणि व्यावसायिक कौशल्य वाढविण्याच्या उद्द्शाने पर्वरी येथील विधानसभा संकुलात क्षमता-बांधणी कार्यक्रमाचे आयोजन केले.
या कार्यक्रमाला हरियाणा विधानसभेचे सभापती श्री हरविंदर कल्याण यांची उपस्थिती लाभली, ज्यांनी विधीमंडळ आणि संसदिय कामकाजाच्या विविध पैलूंची माहिती दिली. आपल्या समृद्ध अनुभवाच्या आधारे, श्री कल्याण यांनी विधीमंडळाच्या प्रभावी कामकाजासाठी कार्यक्षमता, पारदर्शकता आणि संसदीय कार्य पद्धतींचे पालन करण्याच्या महत्त्वावर भर दिला. त्यांनी व्यवस्थापन, शिष्टाचार आणि इतर संस्थात्मक बाबींवर महत्वपूर्ण मार्गदर्शनही केले.
गोवा विधानसभेचे सभापती डॉ. गणेश गावकर यांनीही विधीमंडळाच्या बदलत्या भूमिकेवर आपले मौल्यवान विचार मांडले.
या चर्चा सत्रात गोवा विधीमंडळ सचिवालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला, तसेच त्यांनी विधीमंडळ आणि प्रशासकीय प्रक्रिया सुधारण्यावर सक्रियपणे चर्चा केली व विचारांची देवाणघेवाण केली.
विधीमंडळ सचिवालय सचिव श्रीमती नम्रता उल्मन, संयुक्त सचिव श्री. मोहन गावकर उपस्थित होते. कुमारी स्त्रीगधरा नाईक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रकाश सतरकर यांनी आभार मानले.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/४३६
