कला आणि संस्कृती संचालनालयाच्या योजनेसाठी मुदतवाढ
२९ जून, २०२६
कला आणि संस्कृती संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांअंतर्गत लाभ मिळविण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज, शिफारस अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १७ जुलै २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
कलाकारानी कृपया याची नोंद घ्यावी आणि कला व संस्कृती संचालनालय, संस्कृती भवन येथून अर्ज मिळवावेत. तसेच योजनेचे अर्ज आणि सविस्तर निकष www.artandculture.goa.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ज्या कलाकारांनी, गट, व्यक्तींनी, संस्थांनी यापूर्वी वरील योजनांसाठी अर्ज केला होता आणि त्यांच्या विचार केला गेला नव्हता ते पुन्हा अर्ज करू शकतात.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/४०२
