Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

काजू गोळा लिलावात भाग घेण्यासाठी नोंदणी आणि अर्ज सादर करण्याची सूचना

१३ ऑक्टोबर, २०२६

गोवा वन विकास महामंडळ लिमिटेडने गोव्यातील गोवा वन विकास महामंडळ अखत्यारीतील विविध काजूच्या मळ्यांमधून काजू आणि काजूफळे गोळा करण्यासाठी वैयक्तिक आणि स्वयं-सहायता गटांना नोंदणी निविदा अर्ज सादर करण्याची सूचना केली आहे. लिलाव/बोली प्रक्रियेचा कालावधी खालीलप्रमाणे आहे.

काजू लिलावात नोंदणीसाठीचा निविदा अर्ज, १५ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत संबंधित रेंज कार्यालयात उपलब्ध आहेत. पाकीट बंद अर्ज संबंधित रेंज कार्यालयानी ठेवलेल्या बॉक्समध्ये टाकावे.

काणकोण रेंजसाठी निविदा ४ नोव्हेंबर २०२६ रोजी जीएफडीसीएल, रेंज ऑफिस, शेळेर, काणकोण येथे उघडण्यात येतील. अधिक माहितीसाठी श्री मोहनदास नाईक, आरएफओ – ९८२३९८७१०० यांच्याशी संपर्क साधावा. केपे रेंजसाठी निविदा ६ नोव्हेंबर २०२६ रोजी जीएफडीसीएल, रेंज ऑफिस, फॉरेस्ट कॉलनी, केपे येथे उघडण्यात येतील. अधिक माहितीसाठी श्री बिपिन फळदेसाई, आरएफओ – ९१५८९२७१०६ यांच्याशी संपर्क साधावा.

फोंडा रेंजसाठी निविदा १३ नोव्हेंबर २०२६ रोजी जीएफडीसीएल, रेंज ऑफिस, शेलार, फोंडा येथे उघडण्यात येतील. अधिक माहितीसाठी श्री प्रणय नाईक, आरएफओ – ७७९८९८६१६६ यांच्याशी संपर्क साधावा. मोर्ले रेंजसाठी निविदा १८ नोव्हेंबर २०२६ रोजी जीएफडीसीएल, रेंज ऑफिस, गिमाई वाडा, मोर्ले, सत्तरी येथे उघडण्यात येतील. अधिक माहितीसाठी श्री प्रज्योत नाईक, आरएफओ – ७७९८९८६०७९ यांच्याशी संपर्क साधावा.

सविस्तर नियम आणि अटी गोवा वन विकास महामंडळ लिमिटेडच्या वेबसाइटवर https:/ goafdc.goa.gov.in येथे उपलब्ध आहेत.

मा/वाप/अहे/ एपी/ रना/ २०२६/६८९

Skip to content