२६ नोव्हेंबर रोजी संविधान दिवस
२४ नोव्हेंबर २०२६
सर्व साधारण प्रशासन खात्याने पर्वरीतील सचिवालयातील खुल्या जागेत २६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता संविधान दिवस साजरा केला जाणार असल्याची माहिती दिली आहे. यामध्ये मुख्य सचिव संविधानाची ‘प्रस्तावना’ वाचून दाखवतील. भारताच्या संविधानाचा स्वीकार झाल्याच्या स्मरणार्थ संविधान दिवस साजरा केला जातो.
मा/वाप/अभी /ऑपी/रना/ २०२६/ ८२७
