Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

बीडीएस कोर्ससाठी पात्रता निकषांमध्ये सुधारणा

११ सप्टेंबर, २०२६

पदवीपूर्व आणि पदव्युत्तर दंत शिक्षण मंडळ, राष्ट्रीय दंत आयोगाने सुधारित बीडीएस अभ्यासक्रम नियमांनुसार, दंत महाविद्यालयातील बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या पात्रता निकषांमध्ये, विहित नीट पर्सेंटाइल व्यतिरिक्त, पात्रता परीक्षेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र/बायोटेक्नॉलॉजी या विषयांमध्ये एकत्रितपणे किमान ५० टक्के गुण असण्याची अट समाविष्ट असल्याचे कळविले आहे.

बीडीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पात्र होण्याकरिता, उमेदवाराने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र/बायोटेक्नॉलॉजी व इंग्रजी या विषयांमध्ये स्वतंत्रपणे उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि पात्रता परीक्षेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र/बायोटेक्नॉलॉजी या विषयांमध्ये एकत्रितपणे किमान ५० टक्के गुण मिळविलेले असावेत. याव्यतिरिक्त, बीडीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या “राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षेच्या” गुणवत्ता यादीत उमेदवाराचे नाव आलेले असावे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा इतर मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत, पात्रता परीक्षेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र/बायोटेक्नॉलॉजी या विषयांमध्ये एकत्रितपणे मिळविलेले किमान गुण ५० टक्क्याऐवजी ४० टक्के असतील. पायांच्या हालचालीचे दिव्यांगत्व असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत, पात्रता परीक्षेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र/बायोटेक्नॉलॉजी या विषयांमध्ये एकत्रितपणे मिळविलेले किमान गुण ५०% ऐवजी ४५ टक्के असतील.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/६३१

Skip to content