कोल्हापूर येथे अग्निवीर भरती रॅलीचे आयोजन
८ सप्टेंबर २०२६
कोल्हापूर येथील लष्कर भरती कार्यालयाने उग्निपथ योजनेकाली भारतीय सैन्य दलात अग्निवीर जनरल ड्युटी, अग्निवीर तांत्रिकी, अग्निवीर ट्रेड्समन ८ वी आणि १० वी उत्तीर्ण पदांच्या भरतीसाठी १७ ते २९ सप्टेंबर २०२६ पर्यंत छत्रपती संभाजी महाराज विभागिय क्रिडा प्रकल्प, कोल्हापूर आमि रत्नागिरी या पांच जिल्ह्यातील उमेदवारांसाठी आणि गोवा राज्याच्या उत्तर आणि दक्षिण गोव्यातील उमेदवारांसाठी ही रॅली लागू आहे. महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील युवकांना लष्करात रोजगार देऊन देशाची सेवा करण्याची संधी देणे हा भरती रॅलीचा उद्देश आहे.
अधिक माहितीसाठी उमेदवारांनी भारतीय सैन्य दलाच्या www.joinindianarmy.nic.in या वेबसाईटवर भेट द्यावी. तसेच अधिक माहितीसाठी सैन्य भरती कार्यालय, कोल्हापूर ०२३१-२६०६४१९ या लॅंडलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/६१९
