Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

१२ ऑगस्ट २०२६

होरायझन डीटीसी मरड सांगोल्डा फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने १३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० ते संध्या ४.३० वाजेपर्यंत होरायझन इमारत, सांगोल्डा, मरड भाग आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

त्याचप्रमाणे २०० केव्हीए स्पाईस डीटीसी आणि २०० केव्हीए न्यू काचोळे डीटीसीवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने १३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत उर्मलबागवाडा, मालेकरवाडा, कचोळेवाडा, मुनागवाडा, नवतारा हॉटेल आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/५१९

Skip to content