बेवारस वाहनासंबंधी दावे सादर करण्याचे आवाहन
२१ जुलै, २०२६
सासष्टी तालुक्यातील मडगाव वाहतूक कक्षाच्याहद्दीत रस्त्याच्या कडेला दीर्घकाळ उभ्या असलेल्या आणि त्यामुळे जनतेला अडथळा, गैरसोय व संभाव्य धोका निर्माण करणाऱ्या वाहनासंबंधी दावे सांगण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तीनी प्रसिद्धी पत्रक प्रसिध्द झालेल्या तारखेपासून ६ महिन्यांच्या आत, कागदोपत्री पुराव्यांसह आपले दावे उपजिल्हाधिकारी आणि उपविभागीय दंडाधिकारी – १, मडगाव यांच्या कार्यालयात सादर करावे अशी विनंती करण्यात येत आहे.
विहित मुदतीत अशा वाहनासंबंधी आक्षेप, दावे न आल्यास ती वाहने सरकार आपल्या ताब्यात घेतील आणि सार्वजनिक लिलावाद्वारे त्यांची विल्हेवाट लावणार. अशा सर्व बेवारस वाहनांची यादी मडगाव येथील उप जिल्हाधिकारी आणि उपविभागीय दंडाधिकारी-१ यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/४४०
