दिव्यांग व्यक्तींसाठी शिष्यवृत्ती आणि विध्यावेतन योजना
९ जुलै, २०२६
दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण खात्याने विविध शाळा, महाविध्यालय आणि संस्थेत शिकणा-या दिव्यांग विध्यार्थ्यांना विध्यावेतन आणि शिष्यवृत्ती देण्यासाठी कल्याणकारी योजनेची अंमलबजावणी केली आहे.
अंगणवाडी/पूर्वप्राथमिक/बालवाडी ते इयत्ता दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यावेतन रु. ३००/-, इयत्ता तिसरी ते पाचवीसाठी रु. ४००/- आणि इयत्ता सहावी ते आठवीसाठी रु. ५००/- प्रति महिना ११ महिन्यांसाठी विध्यावेतन देण्यात येते. विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार इयत्ता नववी ते बारावी किंवा तत्सम विद्यार्थ्यांसाठी दिवसा शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (डे स्कॉलर) रु. ९००/- प्रति महिना ११ महिन्यांसाठी, वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (हॉस्टेलर्स) रु. ४००/- प्रति महिना ११ महिन्यांसाठी आणि अंध विद्यार्थ्यांसाठी वाचन भत्त्याकरिता रु. ३००/- प्रति महिना ११ महिन्यांसाठी देण्यात येतात.
बीए/ बी.कॉम./ बीएससी इत्यादी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी, दिवसा शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता ११ महिन्यांकरिता दरमहा रु. १,१००/-, वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता ११ महिन्यांकरिता दरमहा रु. ५००/- आणि अंध व्यक्तींसाठी वाचन भत्त्याकरिता ११ महिन्यांकरिता दरमहा रु. ५३०/- आहे. तसेच एमए/एमएससी/एम.कॉम आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी, दिवसा शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता ११ महिन्यांकरिता दरमहा रु. १,३००/-, वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता ११ महिन्यांकरिता दरमहा रु. ४५०/- आणि अंध व्यक्तींसाठी वाचन भत्त्याकरिता ११ महिन्यांकरिता दरमहा रु. ६००/- आहे.
दिव्यांग व्यक्तीकडे किमान ४० टक्के किंवा त्याहून जास्त दिव्यांग असलेला वैध्यकिय मंडळाचे प्रमाणपत्र असावे. गुणपत्रिकेची प्रत, पालकांचे वार्षिक उत्पन्न ८ लाखापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्यांकडे युडीआयडी कार्ड, आधार कार्ड आणि बँक पासबुक असणे आवश्यक आहे (बँक खाते आधारशी जोडलेले असावे). त्याचप्रमाणे, मान्यताप्राप्त शिक्षण मंडळ किंवा विद्यापीठामार्फत संगीत आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्यासाठीही शिष्यवृत्ती दिली जाते.
या योजनेअंतर्गत केवळ ऑनलाइन अर्जच स्वीकारले जातील. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता सीएम स्कॉलरशिप पोर्टल cmscholarship.goa.gov.in वर विद्यार्थ्यांची नोंदणी १५ जुलै २०२६ पासून सुरू होईल. विद्यावेतन आणि शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी नोंदणी आणि अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १५ ऑक्टोबर २०२६ अशी आहे. मान्यताप्राप्त शिक्षण मंडळ किंवा विध्यापिठातर्फे संगीत आणि व्यावसायिक वर्गाचे शिक्षण घेणा-यांनाही शिष्यवृत्ती देण्यात येते.
अधिक माहितीसाठी दिव्यांग सशक्तीकरण खात्याशी मोबाईल क्रमांक ९८३४३७३०८१ वर संपर्क साधावा किंवा dir-depwd@goa.gov.in वर भेट द्यावी.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/४३५
