बी.टेक कृषी अभियांत्रिकी प्रवेशासाठी अर्ज मागविले
९ जुलै, २०२६
कृषी संचालनालयाने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, रत्नागिरी, महाराष्ट्र येथे बी.टेक कृषी अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले आहेत. बी.टेक कृषी अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी २ विद्यार्थ्यांना पुरस्कृत केले जाते. बी.टेक कृषी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी उमेदवारांची निवड जेईई (मेन) निकालाच्या आधारावर केली जाईल.
कृषी संचालनालय, कृषी भवन, टोंक, करंझाळे येथे विहीत नमुन्यातील अर्ज उपलब्ध आहेत किंवा कृषी संचालनालयाच्या www.agri.goa.gov.in या संकेतस्थळावर डाऊनलोड करू शकतात. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख २७ जुलै, २०२६ अशी आहे.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/४३४
