गोवा क्रांती दिनानिमित्ताने प्रश्न मंजुषा स्पर्धेचे आयोजन
१५ जून २०२६
मिनेझीस ब्रागांझा संस्थेने गोवा क्रांती दिनानिमित्ताने १८ जून रोजी दुपारी २.३० वाजता पणजी संस्थेच्या सभागृहात उच्च माध्यमिक शाळांच्या विध्यार्थ्यांसाठी अखिल गोवा पातळीवर प्रश्न मंजुषा स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत गोव्यातील उच्च माध्यमिक शाळांचे विध्यार्थी भाग घेऊ शकतात. स्पर्देचे प्रथम बक्षिस ५ हजार रूपये आणि चषक, दुसरे बक्षिस ४ हजार रूपये आणि चषक, तिसरे बक्षिस ३ हजार रूपये आणि चषक आणि प्रत्येकी २ हजार रूपयांची उत्तेजनार्थ बक्षिसे असतील. त्याचप्रमाणे स्पर्धेत भाग घेणाऱ्या विध्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रे देण्यात येतील. उच्च माध्यमिक शाळांनी आपल्या दोन विध्यांर्थी गटास प्रश्न मंजुषा स्पर्धेत भाग घेण्यास पाठवावे असे मिनेझीस ब्रागांझा संस्थेने मागितले आहे.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/३८२
