वीज पुरवठा खंडित
१ जून २०२६
११ केव्ही उतोर्डा फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ३ जून २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत प्रायल-१ आणि २ भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
त्याचप्रमाणे ११ केव्ही आरोशी फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ४ जून २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत बागा, कांसावली चर्च, झंडो आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
तसेच ११ केव्ही कांसावली फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ५ जून २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत वेळसांव पाळे, बेले, इन्फंट जिजस, दांडो आणि फॅब्रिका भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/३५३
