Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

बाधित शेतकऱ्यांच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या नुकसान भरपाईच्या दाव्यांसाठी सुरला येथे सुविधा शिबिर

१३ मे २०२६

न्यायालयीन आयुक्त म्हणून कार्यभार सांभाळणारे डिचोली येथील उपजिल्हाधिकारी आणि उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाने डिचोली तालुक्यातील सुरला गावातील शेतकरी, रहिवासी, माल, कायदेशीर वारस, उत्तराधिकारी यांच्यासाठी सुरला येथील सरकारी विद्यालयात २० मे २०२६ ते २२ मे २०२६ या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुविधा शिबीराचे आयोजन केले आहे.

संबंधित दावेदारांनी फॉर्म १ चौदाचा उतारा, ओळखपत्र, बँकेचा तपशील, मृत्यू प्रमाणपत्र, कायदेशीर वारसा हक्काची कागदपत्रे (लागू असल्यास), इतर कायदेशीर वारस किंवा सह-मालकांची संमती/ना हरकत प्रमाणपत्र/अधिकारपत्र (आवश्यक असल्यास) आणि १०० रूपयांच्या स्टॅम्प पेपरवर शपथपूर्वक/निष्पादित केलेले क्षतिपूर्ती बंधपत्र/सामूहिक क्षतिपूर्ती बंधपत्र यासह संबंधित कागदपत्रांसह शिबिरात उपस्थित राहावे.

ज्या कुटुंबांचे दावे दीर्घकाळापासून प्रलंबित आहेत त्यांच्यासाठी हे शिबिर एक महत्त्वाची संधी आहे. त्यामुळे सर्व पात्र बाधित शेतकरी, रहिवासी, मालक आणि कायदेशीर वारसांना पुढे येऊन, आपल्या हक्काची पडताळणी करून, आपली कागदपत्रे तयार ठेवून, या सुविधा उपक्रमाचा पुरेपूर लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/३१६

Skip to content