वीज पुरवठा खंडित
१३ मे २०२६
११ केव्ही मागुर फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने १५ मे २०२६ रोजी सकाळी ८.०० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत मेस्तावाडो, राममंदिर, अमर जटायु आणि भुतेभाट भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
त्याचप्रमाणे ११ केव्ही कुर्पे फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने १४ मे २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत कुर्पे, विचुंद्रे, नावेली, उर्मितवाडा, जांबगाळ आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/३१४
