१ मे रोजी कामगार दिवस
२९ एप्रिल २०२६
कामगार आणि रोजगार आयुक्त कार्यालयातर्फे १ मे २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता दरबार हॉल, लोक भवन, दोनापावला येथे “कामगार दिन” साजरा करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील. कामगार व रोजगार मंत्री, पणजी महापालिकेचे महापौर, मुख्य सचिव, कामगार सचिव आणि आयुक्त हेही कार्यक्रमास उपस्थित राहतील.
या प्रसंगी, आपापल्या क्षेत्रात अनुकरणीय कार्य व समर्पित सेवा केलेल्या २० औद्योगिक कामगारांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते “श्रमिक मित्र” पुरस्काराने, गौरविण्यात येईल.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/२७४
