Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

उष्णतेच्या लाटेसंबंधी सल्ला

३१ मार्च २०२६

गोवा राज्यात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाने उष्णतेच्या लाटेदरम्यान सुरक्षा उपाययोजना जारी केल्या आहेत. उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांचा धोका कमी करण्यासाठी आणि वैयक्तिक सुरक्षितता घेण्यासाठी नागरिकांना खालील खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

सुरक्षित राहण्यासाठी, स्थानिक हवामानाच्या बातम्यांसाठी रेडिओ ऐका, टीव्ही पाहा, वर्तमानपत्र वाचा, तहान लागली नसली तरीही शक्य तितके आणि पुरेसे पाणी प्या, हलके, फिकट रंगाचे, सैल आणि सुती कपडे घाला, उन्हात बाहेर जाताना गॉगल, छत्री/टोपी, बूट किंवा चप्पल वापरा, प्रवास करताना सोबत पाणी ठेवा, बाहेर काम करत असल्यास टोपी किंवा छत्री वापरा आणि डोके, मान, चेहरा व हातपायांवर ओला कपडा ठेवा, शरीराला पुन्हा हायड्रेट करण्यासाठी ओआरएस, नारळाचे पाणी, लस्सी, तोरणी (तांदळाचे पाणी), लिंबाचे पाणी, ताक इत्यादी घरगुती पेये वापरा, स्वयंपाकाच्या जागेत पुरेशी हवा खेळती राहण्यासाठी दारे आणि खिडक्या उघड्या ठेवा, चक्कर आल्यास किंवा आजारी वाटल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

पाळीव प्राण्यांना सावलीत ठेवा आणि पिण्यासाठी त्यांना पुरेसे पाणी द्या, छतावर/बाल्कनीवर लहान भांड्यांमध्ये पक्ष्यांसाठी पिण्याचे पाणी ठेवा, आपले घर थंड ठेवा, पडदे, शटर किंवा सनशेड वापरा आणि रात्री खिडक्या उघड्या ठेवा, पंखा वापरा, कपडे ओले ठेवा आणि वारंवार थंड पाण्याने अंघोळ करा, कामाच्या ठिकाणी थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्या. कामगारांना थेट सूर्यप्रकाश टाळण्याचा सल्ला दिला जातो, कठीण कामे दिवसाच्या थंड वेळेत करा, बाहेरील कामांसाठी विश्रांतीची वारंवारता आणि कालावधी वाढवा, गर्भवती महिला आणि इतर वैद्यकीय समस्या असलेल्या व्यक्तींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.

त्याचप्रमाणे, पार्क केलेल्या वाहनांमध्ये मुलांना किंवा पाळीव प्राण्यांना सोडू नका, उन्हात विशेषतः दुपारी १२.०० ते ३.०० च्या दरम्यान बाहेर जाणे टाळा, गडद रंगाचे, जाड किंवा घट्ट कपडे घालणे टाळा, बाहेरचे तापमान जास्त असताना कष्टाची कामे करणे टाळा, दुपारच्या उन्हात स्वयंपाक करणे टाळा, शरीरातील पाणी कमी करणारे मद्य, चहा, कॉफी आणि कार्बनयुक्त शीतपेये टाळा, उच्च प्रथिनयुक्त पदार्थ खाणे टाळा आणि शिळे अन्न खाऊ नका.

मा/वाप/दिबा/एपी/र ना/२०२६/२१६

Skip to content