Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

कला अकादमीमध्ये १ एप्रिल रोजी वार्षिक फॅशन प्रमोशन कार्यक्रम

३० मार्च २०२६

पणजी येथील सरकारी तंत्रनिकेतनाच्या गार्मेंट टेक्नॉलॉजी विभागाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांद्वारे वार्षिक फॅशन प्रमोशन कार्यक्रमाचे १ एप्रिल २०२६ रोजी संध्या ६.०० वाजता आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात गारमेंट टेक्नॉलॉजी विभागातील वस्त्र डिझाइन आणि निर्मितीमधील फॅशन क्षेत्रातील उदयोन्मुख प्रतिभेला संधी दिली जाईल. या कार्यक्रमात फॅशन क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहतील.

मा/वाप/दिबा/एपी/र ना/२०२६/२१५

Skip to content