Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

राज्यपालांकडून गोव्यातील लोकांना राम नवमीच्या शुभेच्छा

२५ मार्च २०२६

गोव्याचे राज्यपाल श्री. पुसापती अशोक गजपती राजू यांनी गोव्यातील लोकांना राम नवमीच्या हार्दिक शुभेच्या व्यक्त केल्या आहेत

आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात, राम नवमीच्या शुभप्रसंगी मी गोव्यातील लोकांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. हा पवित्र सण भगवान श्री रामांच्या जन्माचे प्रतीक आहे, भगवान श्री राम धर्म, सद्गुण, करुणा आणि आदर्श राजाचे मूर्तस्वरूप आहे. भगवान श्री राम हे मर्यादा पुरूषोत्तम म्हणून ओळखले जातात. रामाचे जीवन आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात सत्य, न्याय, मानवता आणि इश्वरभक्तीची मूल्यांचे पालन करण्याची प्रेरणा देते.

या आनंदमय प्रसंगी आपण धर्माच्या तत्त्वांप्रति आपली वचनबद्धता पुन्हा दृढ करूया आणि आपल्या समाजात शांतता, सलोखा व समाजाच्या समृद्धीसाठी एकत्रितपणे कार्य करूया.

रामनवमीचा हा सण आपण सर्वांना आनंद, चांगले आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो आणि आपल्याला सत्याच्या मार्गावर मार्गदर्शन करो असे राज्यपाल आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.

मा/वाप/दिबा/एपी/र ना/२०२६/२०४

Skip to content