Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

श्री हळर्णकर यांच्याहस्ते मिशन रेबीज मॉडेल व्हिलेज प्रकल्पाचे उद्घाटन

२४ मार्च २०२६

मत्स्योध्योग तथा पशुसंवर्धन मंत्री श्री. निळकंठ हळर्णकर यांनी नुकतेच बार्देश येथील कोलवाळे या मॉडेल गावात ‘मिशन रेबीज मॉडेल व्हिलेज प्रोजेक्ट’चे उद्घाटन केले.

मिशन रेबीज मॉडेल व्हिलेज प्रकल्प हा रेबीज प्रतिबंध आणि पशू कल्याणासाठी तयार करण्यात आला आहे. निवडक गावांना रेबीज-सुरक्षितर करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.

रेबीज हा रोग एक प्रतिबंधात्मक रोग असून प्राणघातक पशूजन्य रोग आहे. रेबीजच्या शाश्वत नियंत्रणासाठी सामुदायिक मालकी, श्वानांच्या लोकसंख्येचे मानवी व्यवस्थापन आणि दीर्घकालीन वर्तणुकीतील बदल आवश्यक आहेत. सीमावर्ती राज्यांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असूनही, गोवा आता जवळजवळ रेबीजमुक्त राज्य म्हणून राखले गेले आहे.

उत्तर गोव्यातील कोलवाळे पंचायत आणि दक्षिण गोव्यातील वेळ्ळी पंचायत ही दोन गावे आता आदर्श गाव प्रकल्पासाठी हाती घेण्यात आली आहेत, जिथे मिशन रेबीज आणि पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय सेवा संचालनालय, गोवा व्यवस्थापन संस्थेच्या सहकार्याने घरोघरी सर्वेक्षण करतील. त्यानंतर कुत्र्यांचे लसीकरण, कुत्र्यांची नसबंदी, रेबीजवर देखरेख, कुत्रा चावल्यास काय करावे याबद्दल मुलांचे आणि समाजाचे शिक्षण, तसेच कुत्र्यांच्या आरोग्याची काळजी या उपाययोजना राबविल्या जातील.

प्रकल्पाचा कालावधी २३ मार्च २०२६ ते ५ एप्रिल २०२६ असा असून – घरोघरी सर्वेक्षण आणि शिक्षण, त्यानंतर लसीकरण, शिक्षण, श्वान नसबंदी, ३१ मार्च २०२९ पर्यंत चालू असेल.

मा/वाप/दिबा/एपी/र ना/२०२६/२०३

Skip to content