Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

निवडणूक साहित्य छापण्यासंदर्भात निर्देश जारी

२३ मार्च २०२६

२१-फोंडा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाने, लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ च्या कलम १२७ अ नुसार, गोव्यातील मुद्रणालयांना पत्रके, पोस्टर्स आणि इतर निवडणूकीचे साहित्य छापताना निवडणूक आयोगाने मुद्रणालयांना लागू केलेल्या छपाईवरील निर्बंधांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.

निवडणूक पत्रक किंवा पोस्टरवर मुद्रक आणि प्रकाशकाचे नाव आणि पत्ता स्पष्टपणे नमूद केलेला असावा. निवडणूक पत्रक किंवा पोस्टर छापण्यास सांगणाऱ्या व्यक्तीकडून सही केलेले ओळखीबाबतचे घोषणापत्र घेतले पाहिजे. जे तिची/त्याची वैयक्तिक ओळखीच्या दोन व्यक्तींनी साक्षांकित केलेले असावे, आणि त्याच्या दोन प्रतीं मुद्रकाकडे सुपूर्द केल्या पाहिजेत. निवडणूकीचे साहित्य छापल्यानंतर वाजवी वेळेत, मुद्रकाकडून घोषणापत्राची एक प्रत, साहित्याच्या प्रतिचा आकडा आणि इतर माहिती साहित्याच्या एका प्रतीसह राज्याच्या राजधानीत छापले असेल तर मुख्य निवडणूक अधिकाऱ्याकडे आणि जिल्ह्यात ते छापले असल्यास त्या जिल्हाधिकाऱ्याकडे पाठविल्या पाहिजेत.

या अधिनियमातील कोणत्याही तरतुदींचे उल्लंघन केल्यास, त्याला सहा महिन्यांपर्यंतच्या कारावासाची, किंवा दोन हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

मा/वाप/दिबा/एपी/र ना/२०२६/१९९

Skip to content