वंदे मातरमवर रील बनविण्याची स्पर्धा
२३ मार्च २०२६
वंदे मातरम राष्ट्रीय गीताचे १५० वे वर्ष साजरा करण्याचा कार्यक्रमाच्या २३ ते ३० मार्च २०२६ या कालावधीत विशेष टप्प्यानिमित्ताने रील मेकींग स्पर्धेचे आयोजन केले आहे. देशभक्ती, राष्ट्रीय ऐक्य, सांस्कृतिक वारसा आणि वंदे मातरम राष्ट्रीय गीताचा संदेश आणि प्रेरणा देण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या रील तयार करण्याच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कला आणि संस्कृती संचालनालयाने प्रवेशिका मागविल्या आहेत.
रीलचा कालावधी एका मिनिटापेक्षा कमी असावा आणि ती व्हर्टिकल व्हिडिओ (९:१६), MP4/MOV या फॉरमॅटमध्ये असावी. रीलमध्ये वंदे मातरम या गीताचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले जाईल, परंतु ते अनिवार्य नाही. जर त्याचा वापर केला गेला, तर तो सन्मानपूर्वक आणि आदराने केला पाहिजे. स्पर्धा दोन गटांमध्ये आयोजित केली जाईल – १८ वर्षांपर्यंत आणि १८ वर्षांवरील. प्रत्येक गटासाठी बक्षिसे खालीलप्रमाणे असतील: प्रथम पारितोषिक – रु. १०,०००/-, व्दितीय पारितोषिक – रु. ७,५००/- आणि तृतीय पारितोषिक – रु. ५,०००/-.असे असेल.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांनी ३० मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत ९४२२०६१६५० या व्हॉट्सॲप क्रमांकावर त्यांचे रील्स पाठवावे. अधिक माहितीसाठी, ०८३२-२४०४६००/६३०/६३१ या क्रमांकांवर संपर्क साधावा.
मा/वाप/दिबा/एपी/र ना/२०२६/१९८
