मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून गोव्यातील लोकांना ईद- उल-फित्रच्या शुभेच्छा
20 मार्च २०२६
मुख्यमंत्री, डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून गोव्यातील लोकांना विशेषतः मुस्लिम समाजाला ईद-उल-फित्रच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या संदेशात मुख्यमंत्र्यांनी सर्वांसाठी शांतता, सलोखा, बंधुभाव, सुख आणि समृद्धीच्या सदिच्छा व्यक्त केल्या.
मुख्यमंत्री म्हणतात, ईद हा उपवास, प्रार्थना आणि दानधर्माचा महिना असलेल्या रमजानची सांगता करतो. सर्वांनी दयाळूपणा, एकता व परस्पर आदराची मूल्ये जपावी असे मुख्यमंत्री आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.
मा/ वाप/दिबा/ एपी/ र ना/ २०२६
