Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

राज्यपालाकडून गोव्यातील लोकांना ईद-उल-फित्रच्या शुभेच्छा

२० मार्च २०२६

राज्यपाल , श्री पुसापती अशोक गजपती राजू यांनी गोव्यातील लोकांना ‘ईद-उल-फित्र’च्या शुभप्रसंगी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात, “ईद-उल-फित्र हा रमजानच्या पवित्र महिन्याच्या समाप्तीचा सण आहे. हा काळ प्रार्थना, चिंतन, करुणा आणि आत्मशिस्त यासाठी समर्पित असतो. हा आनंदाचा सण श्रद्धा, कृतज्ञता आणि एकमेकांना मदत करण्याच्या व एकमेकांची काळजी घेण्याच्या भावनेचा उत्सव आहे. तसेच, समाजातील सर्व घटकांमध्ये शांतता, करुणा आणि एकतेवर भर देणाऱ्या महान पैगंबर मोहम्मद यांच्या शिकवणींचे स्मरण करण्याचा आणि त्यातून मार्गदर्शन घेण्याचा हा एक प्रसंग आहे.”

या पवित्र प्रसंगाने सर्व समुदायांमधील सलोखा, बंधुभाव आणि एकतेचे बंध अधिक दृढ होतील, अशी आशा राज्यपालांनी व्यक्त केली. “हा दिवस प्रत्येकाला शांतता, समृद्धी आणि आनंद घेऊन येवो असे राज्यपाल आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.

मा/वाप/दिबा/एपी/र ना/२०२६

Skip to content