Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

मुख्यमंत्र्यांकडून जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

पणजी: १८ मार्च २०२६

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुढीपाडव्याच्या शुभ प्रसंगी राज्यातील जनतेला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. पारंपारिक पद्धतीने नववर्षाची सुरुवात होणाऱ्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने, मुख्यमंत्री सावंत यांनी सर्वांना सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभो, अशा शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या संदेशात मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणतात, की “हिंदू पंचांगानुसार नववर्षाचे प्रतीक म्हणून चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी गुढीपाडवा साजरा केला जातो. हा दिवस सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.” मुख्यमंत्र्यांनी संदेशात आपल्या सांस्कृतिक परंपरेचे जतन करण्यावर भर दिला आणि आगामी वर्ष सर्वांसाठी यशस्वी व शांततापूर्ण जावो, अशी सदिच्छा व्यक्त केली.

मुख्यमंत्री सावंत संदेशात पुढे म्हणतात, “गुढीपाडव्याचा उत्सव विविध राज्य आणि प्रदेशांमध्ये, वेगवेगळ्या प्रथा-परंपरांसह अत्यंत उत्साहात आणि दिमाखात साजरा केला जातो. या दिवशी लोक आपली सामाजिक आणि आध्यात्मिक मूल्ये पुन्हा एकदा दृढ करतात आणि भविष्यात अधिक चांगले व फलदायी जीवन घडवण्यासाठी स्वतःला नव्याने समर्पित करतात. आजच्या दिवशी आपण सर्व देखील एकतेची भावना अधिक बळकट करूया आणि ‘विकसित भारत’ व ‘स्वयंपूर्ण गोवा’ साकारण्याच्या दिशेने अधिक जोमाने योगदान देत, आपल्या राष्ट्राला यशाच्या नव्या शिखरावर पोहचविण्यासाठी कठोर परिश्रम करूया.”

“मला आशा आहे की, गुढीपाडव्याचा हा सण आम्हा सर्वांना एकोपा आणि स्नेहाच्या बंधात गुंफून ठेवेल. हा उत्सव प्रत्येकाच्या आयुष्यात अपार सुख, नव्या संधी आणि यशाचा पाया ठरो. हे नवीन वर्ष आपल्या सर्वांसाठी यश आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो. तसेच हे संपूर्ण वर्ष सकारात्मकता आणि प्रगतीने परिपूर्ण असे जावो, अशा शुभेच्छा मी सर्वांना देतो,” असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशाद्वारे म्हटले आहे.

सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !

Skip to content