Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

भारतीय सैन्यात अग्निवीर भरती

२६ फेब्रुवारी २०२६

भारतीय सैन्य दलात अग्निवीर जनरल ड्यूटी, अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर सीआयके/स्टोअर कीपर टेक्निकल, अग्निवीर ट्रेड्समन ८ वी आणि अग्निवीर ट्रेड्समन १० वी पदांच्या भरतीसाठी १३ फेब्रुवारी २०२६ पासून नोंदणी सुरू झाली आहे. ही नोंदणी १ एप्रिल २०२६ पर्यंत चालू राहील. नोंदणी भारतीय सैन्य दलाच्या ( www.joinindian army.nic.in या वेबसाईटवर चालू आहे. ही नोंदणी महाराष्ट्र राज्यातील सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि रत्नागिरी या पाच जिल्ह्यांमधील उमेदवारांसाठी आणि गोवा राज्यातील उत्तर गोवा आणि दक्षिण गोव्यातील उमेदवारांना लागू असेल.

उमेदवारांनी नोंदणीसाठी आणि संपूर्ण माहितीसाठी भारतीय सैन्य दलाच्या ( www.joinindian army.nic.in या संकेतस्थळावर भेट द्यावी . तसेच अधिक माहितीसाठी लष्कर भरती कार्यालय, कोल्हापूर लँडलाइन क्रमांक ०२३१- २६०६४१९ वर संपर्क साधावा.

मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/१४३

Skip to content