Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

गोवा विध्यापिठाकडून रिसर्च सहाय्यकांच्या दोन पदासाठी अर्ज

२४ फेब्रुवारी २०२६

गोवा विध्यापिठाने गोवा राज्य रिसर्च फांऊडेशन पुरस्कृत इंडस्ट्रीयल इस्टेट इन गोवा: इंटरप्रिन्युरीयल परस्प्शेन, परफोरमन्स आणि रीजनल डिस्पेरीटीस’’ (गोव्यातील औध्योगिक वसाहती- उध्योजकता ज्ञान, प्रयोग आणि प्रदेशीक विषमता ) या विषयावरील संशोधन प्रकल्पावर काम करण्यास रिसर्च सहाय्यकाच्या दोन पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत.

प्रकल्पाचा कार्यकाळ फक्त १० महिने आहे आणि दरमहा एकत्रित २० हजार रूपये मानधन देण्यात येईल. उमेदवाराचे वय ३५ वर्षापेक्षा जास्त असू नये. उमेदवाराकडे कमीत कमी ५५ टक्के गुणासह समाजशास्त्र किंवा कोणत्याही संबंधित शिक्षणातील मास्टर पदवी पात्रता असावी. स्टॅटिस्टिकल डाटा अनालिसीस ज्ञान आणि अनुभव आवश्यक आहे.

निवड झालेल्या उमेदवाराला गोवा विध्यापिठाच्या गोवा बिजीनेस स्कुलाच्या आर्थिक सेवा शाखेत प्रकल्पावर संशोधन करावे लागेल. मुलाखत २० मार्च रोजी दुपारी २.३० वाजता गोवा बिजीनेस स्कुल, गोवा विध्यापिठ येथे होईल. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला सीव्ही, शैक्षणिक दाखले आणि कामाचा अनुभव दाखला विभाग प्रमुख डॉ संजीता परब यांना २० मार्च २०२६ रोजी दुपारी २.०० वाजेपर्यंत सुपूर्द करावे.

मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/१४१

Skip to content