Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

१५ फेब्रुवारी रोजी वंदे मातरम कोस्टल सायक्लोथॉन रॅली गोव्यात पोचणार

१३ फेब्रुवारी २०२६

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉन रॅली १५ फेब्रुवारी २०२६ रोजी गोव्यातील चिखली गावात पोहोचेल. ही सायक्लोथन रॅली महाराष्ट्रातील सिंधुदूर्ग येथून गोवा राज्यात प्रवेश करणार आहे.

सीआयएसएफ वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉन (व्हीएमसीसी)-२०२६ ला पश्चिम किनाऱ्यावरील गुजरातमधील लखपत किल्ला आणि पूर्व किनाऱ्यावरील पश्चिम बंगालमधील बक्खली येथून हिरवा झेंडा दाखविण्यात आला. वंदे मातरम् च्या १५० व्या वार्षिक दिनानिमित्त देशाच्या किनारी भागातून विधी राज्यातून प्रवास करून स्थानिकाचा प्रचार करणे, समुद्रकिनारा आणि सागरी सुरक्षा जागृती करणे, आणि देशाच्या नील अर्थ व्यवस्थेस चालना देणे हा रॅलीचा उद्देश आहे.

मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/१३४

Skip to content