जनगणना अधिकाऱ्यांसाठी दोन दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
९ फेब्रुवारी २०२६
गोवा जनगणना संचालनालय आणि नियोजन, सांख्यिकी आणि मूल्यमापन संचालनालय, गोवा राज्य जनगणना नोडल विभागाने जिल्हा आणि अतिरिक्त प्रभारी पातळीवरील जनगणना अधिकाऱ्यांसाठी दोन दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्य सचिव डॉ. व्ही. कांदावेलू, आयएएस यांनी पर्वरीतील सचिवालयातील परिषदगृहात केले.
प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रास राज्य जनगणना नोडल अधिकारी आणि सचिव (नियोजन), श्री एस.एस. गिल, आयएएस, जनगणना संचालक, श्रीमती चेष्टा यादव, आयएएस, जिल्हाधिकारी आणि राज्यातील सर्व तीनही जिल्ह्यांचे प्रमुख जनगणना अधिकारी उपस्थित होते.
सत्रादरम्यान, प्रभारी स्तरावरील अधिकाऱ्यांना जनगणना प्रक्रियांची सखोल माहिती, डिजिटल साधनांचा प्रभावी वापर आणि त्यांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्यांबद्दल स्पष्टता तसेच अचूक डेटा संकलन, डेटा गुणवत्ता आणि जनगणना कार्ये सुरळीत पार पाडण्यासाठी क्षेत्रीय पातळीवर प्रशिक्षण आणि तयारी विषयी त्यांनी मार्गदर्शन केले.
गोव्यात १६ एप्रिल २०२६ ते १५ मे २०२६ या कालावधीत जनगणनेचा पहिली पातळी आयोजित करण्यात येणार आहे. जनगणना २०२६ टप्पा-१ दरम्यान ३३ जनगणना प्रश्नांवर माहिती गोळा करतील प्रशिक्षणादरम्यान, अधिकाऱ्याना जनगणना प्रक्रियेविषयी मार्ग दर्शन केले. वैयक्तिक कुटुंबाना त्यांचे जनगणना अर्ज ऑनलाइन भरून सादर करण्यासाठी तयार केलेल्या स्वयं-गणना पोर्टलचीही अधिकाऱ्यांना माहिती करून दिली.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/११७

