१० फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय कृमी निर्मुलन दिवस
९ फेब्रुवारी २०२६
१० फेब्रुवारी २०२६ रोजी संपूर्ण गोव्यात राष्ट्रीय कृमी निर्मूलन दिवस पाळण्यात येणार आहे. या दिवशी १ ते २ वर्षे वयोगटातील सर्व मुलांना आल्बेन्डाजोल २०० मिलीग्राम आणि २ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुलांना आल्बेन्डाजोल ४०० मिलीग्राम ही दंतनाशक गोळी देण्यात येईल. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पालक, शिक्षक आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी पूर्ण सहकार्य करण्याची विनंती अरोग्य सेवा संचालनालयाच्या राज्य कुटुंब कल्याण मंडळाने केली आहे.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/११४

