गोवा विध्यापिठाचा उध्या पदवीदान सोहळा
६ फेब्रुवारी २०२६
गोवा विध्यापिठाचा ३६ वा पदवीदान सोहळा उद्या शनिवारी ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता डॉ शामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम, ताळगांव येथे गोव्याचे राज्यपाल आणि गोवा विध्यापिठाचे कुलपती श्री पुसापती अशोक गजपती राजू आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या पस्थितीत होणार आहे. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव प्रा. अभय करंदीकर हे यावेळी प्रमुख पाहुणे असतील. या सोहळ्यात पीएचडी, पीजी आणि युजी शाखातील गुणवंत विध्यार्थ्यांना पदवी आणि पदके प्रदान करण्यात येईल.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/१११

